
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे हातगाडी,ठेलेवाले छोटे व्यवसायिक यांनी आपल्या कुटुंबाचा ऊदनिर्वाह चालवण्यासाठी बसस्थानक परिसरात दुकाणे थाटली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून वडकी बसस्टॉप परिसरात असलेल्या उडाणपुलाखाली अनेक व्यावसायिक आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत आहे. सदर दुकाणाच्या उत्पन्नातुन व्यावसायिकांना अत्यंत कमी म्हणजे २०० ते ३०० रु पर्यंत रोजी मीळते. त्यात व्यवसायिकांच्या कुटुंबाच्या संसाराचा गाडा हाकलुन तसेच मुला बाळांच्या दवाखाना व शैक्षणिक खर्च भागविला जातो. कधी कधी तर व्यावसायिकांना 50 रु सुध्दा उरत नाही.अशी परिस्थिती व्यावसायिकांची आहे.
मागील नॅशनल हायवेच्या हटावामुळे व रोड रुंदीकरणामुळे अनेकांची जागा जाऊन व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. परिणामी व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. तसेच बऱ्याच व्यावसायीकांवर बँकेच मोठ्या प्रमाणवर कर्ज सुध्दा आहे. व्यवसायाची नियमीत जागा गेल्यामुळे आता त्यांचे हप्ते फेडणे सुध्दा कठिण झालेले आहे. त्यामुळे वडकी येथील व्यावसायिक खुप तणावाखाली जिवण जगत आहे. गावातील काहि नागरिकांनी
अतिक्रमणाबाबत व वाहतुक कोंडीबाबत तक्रार केल्याने आल्या आल्या नवनियुक्त ठाणेदाराने परिणामी उड्डाणपुलाखालील असलेले सर्व दुकाणे हटविली. याकरीता वडकी येथील छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांची भेट घेऊन दुकाने न हटविण्याबाब व व्यवसाय करण्यासंबंधीचे लेखी निवेदन दिले,या निवेदनात व्यावसायिकांनी आमच्या दुकाण समोर वस्तु खरेदी करण्यासाठी कोणतेही वाहन थांबवु देणार नाही.वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही म्हणजेच कमीत कमी जागेत नालीवर आम्ही दुकाणे लावु.पक्के दुकाण ऐवजी हातगाडी किंवा चाकाचे ठेल्यावर दुकाण लावण्यात येईल जे कधीही तात्काळ हटविल्या जातील.या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्या जाईल.त्यामुळे दुकाणे हटविण्यात येवु नये.अश्या मागणीचे व अटींचे निवेदन वडकी ठाणेदाराला देण्यात आले आहे.
ह्यावेळी निवेदन देतांना वडकी येथील मनोज क्षीरसागर,आकाश कोवे, नसीर पठाण,शेख इरफान,मुबरकखा पठाण,चंद्रशेखर कोवे,शेख सादिक,नरेश आत्राम,आशिष केराम,किशोर नैताम,शेख रसिद,मुस्तकखा पठाण,विनायक कींनाके,अनिल वानखेडे,अक्षय गुरुनुले, तुषार धोटे,अनिल मेश्राम,गणेश पोयाम,दिलीप केराम, महेश करपते,विवेक क्षीरसागर,शांताराम सिडाम,यासह अनेकजण उपस्थित होते.