कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणी बाबत शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट व चर्चा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

कीन्ही जवादे येथे आरोग्य केंद्र व्हावे यासाठी सरपंच सुधीर जवादे यांनी शासनाकडे मागणी केली होती.परिसरांतील चाचोरा,धुमका,गाडेघाट,ऐकुर्ली,खैरगांव,पींपरी या गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या चे दृष्टीने , चांगली आरोग्य सेवा मीळावी यासाठी कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणे आवश्यक आहे.वरिल मागणी लक्षात घेता शासनाच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील , डॉ.बरगट, तसेच त्यांच्या चमूने कीन्ही जवादे येथे भेट दिली. ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे सरपंच सुधीर जवादे यांचेशी चर्चा केली. यावेळी सचिव सुनील येंगडे तसेच आरोग्य कर्मचारी, मारुती ईठाळे व नागरिक उपस्थित होते