

सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासन ,प्रशासन व पत्रकारिता यांचा नेहमीच सहसंबंध असतो .जनतेला न्याय देण्याचे काम ,विविध प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते .त्या सोबतच आशा सेविका यांचे कार्य देखील प्रेरणादाइ आहे .साई सेवाश्रम या वतीने या दोन्ही घटकांचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमाने अत्यंत चांगला पायंडा निर्माण केला आहे .मी आयोजकांचे या साठी कौतुक करतो ,असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले .पत्रकार व आरोग्य सेवेसह ग्रामीण भागात जागृती निर्माण करणाऱ्या आशा सेविका यांच्या अतुलनीय कार्याच्या सन्मान सोहळा अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते . दि.27 जाने. रोजी हरे कृष्ण मंगल कार्यालय राळेगाव येथे हा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .पत्रकार बांधवांचा सपत्नीक सन्मान ,स्नेहमिलन सोहळा , अनौपचारिक ऋणानुबंध व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन साई सेवाश्रम मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते .
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुधीर पाटील,उपविभागीय अधिकारी राळेगाव ,प्रमुख अतिथी म्हणून अमित भोईटे तहसीलदार राळेगाव ,केशव पवार गट विकास अधिकारी प. स. राळेगाव,बाबासाहेब दरणे ज्येष्ठ शेतकरी नेते,हिवरा ,शीतलजी मालते पोलिस निरीक्षक राळेगाव , दोन्ही पत्रकार संघटनेचे अध्यक्ष फिरोज लाखानी व राजूभाऊ रोहनकर, डॉ.ओमप्रकाश फुलमाळी,योगेश दंदे एपीआय पो. स्टे.राळेगाव ,बोरकर उप. नि. पो स्टे.राळेगाव आदी मान्यवर या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते . शाल,सन्मानचिन्ह देऊन पत्रकार बांधव व आशा ताई यांच्या कार्याचा गौरव या वेळी करण्यात आला .
पुढे बोलताना त्यांनी “माझ्या प्रशाससिक सेवेची सुरवातच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावापासून झाल्याची माहिती दिली .पत्रकारिता ही जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करते ,आशा सेविका यांचे सुद्धा योगदान महत्वाचे आहे .साई सेवाश्रम मित्र परिवार व बाळू धुमाळ यांनी हा स्तुत्य कार्यक्रम जुळवून आणला त्यांना माझ्या शुभेच्छा असे भाष्य त्यांनी केले .तहसीलदार अमित भोईटे यांनी राळेगाव येथील पत्रकारितेवर व इथल्या सामाजिक चळवळीवर सकारात्मक भाष्य केले .गटविकास अधिकारी यांनी पत्रकार व प्रशासन यातील संबंधावर प्रकाश टाकला .ठाणेदार शीतल मालते यांनी कायदा व सुव्यवस्था यातील इथल्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे भाष्य केले . डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून देखील जागृतीचे काम केले याचे सोदाहरण दाखले देणारे मनोगत व्यक्त केले .तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष फिरोज लाखनी यांनी आजची पत्रकारिता आव्हाने व उपाय या विषयावर मुद्देसुद माहिती मनोगतातून व्यक्त केली .राजू रोहनकर यांनी शासन ,प्रशासन,समाज व पत्रकार या विषयावर परखड व स्पष्ट भूमिका जोरकस पने मांडली .ज्येष्ठ पत्रकार डॉ कैलास वर्मा यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या व नव्याने या क्षेत्रात येणाऱ्याना पत्रकारितेची संकल्पना ,व्याप्ती , जनतेचा विश्वास यावर भाष्य केले . उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला .आजची एकंदर स्थिती ,पत्रकारिता प्रशासन आतील सहसंमध , भूमिका ,विरोध व सहकार्य या सर्वांवर वेगळ्या पातळीवर संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडून आला .प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली . कळंब व राळेगाव तालुक्यातील पत्रकार बांधव त्यांचे कुटुंबीय व आशा सेवकांची लक्षणीय उपस्थिती लक्षवेधक ठरली .या कार्यक्रमाचे संचलन मनीष काळे यांनी तर आभार डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांनी मानले .
