
सहसंपादक -रामभाऊ भोयर
वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारेगांव फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला.हि घटना राष्ट्रीय महामार्गावर आज २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली.
अमर गजानन कडूकर (२८) रा.वडनेर जिल्हा वर्धा असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर अविनाश सुरेश खोंड (२६) रा. वडनेर असे गंभीररित्या जखमी युवकाचे नाव आहे.हे दोन्ही यूवक दुचाकी क्रमांक एम.एच.३२ ए.आर. ०६३९ ने वडकी वरुन वडनेर कडे नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जात होते.दरम्यान वडकी पासून काही अंतरावर असलेल्या कारेगांव फाट्याजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दोन्ही यूवक गंभीररित्या जखमी झाले.घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही जखमी युवकांना वडनेर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता या अपघातातील अमर कडूकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर अविनाश खोंड यांना सेवाग्राम येथे हलविले.दरम्यान या अपघातातील मृतक युवक विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज सेवा समिती वडनेर तथा श्री रामनवमी उत्सव समिती वडनेर चा सक्रिय कार्यकर्ता होता.या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत.
