
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिक्षण विभाग पंचायत समिती, राळेगाव जि प यवतमाळ व सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वडकी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शनी २०२४-२५ चे दी. ९ व १० डिसेंबर रोजी भव्य आयोजन करण्यात आले होते या मध्ये सैनिक पब्लिक स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावून बहुमान मिळवला आहे. पाणी व्यवस्थापन या विषयावर सदर मॉडेल सादर करण्यात आले होते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थीनी श्रुती शेंडे, श्रुतिका मंदाडे, नोबिता उदार, आर्या बोरकुटे व सुहानी धूपे ह्या विद्यार्थीनीचा सहभाग होता मार्गदर्शन शिक्षिका म्हणून शृंखला जयस्वाल व वैष्णवी नक्षिने ह्या लाभल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रशांत गावंडे, उद्घाटक डॉ जयश्री राऊत (शिक्षणाधिकारी माध्य जि प यवतमाळ) डॉ आगरकर
गटशिक्षणाधिकारी श्री राजू काकडे प्राचार्य श्री सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी.बी.एस.ई) यांची उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रणधीरसिंह दुहण, सचिव सत्यवान सिंग दूहण लाभले होते
तसेच उपस्थीथितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रदर्षनी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या.
एकदरित कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगती साठी होता. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
