
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक 1/2/2026 रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक हे पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलींग करीत असातांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली, की पाटणबोरी येथील ऑटो पाईन्ट वरील ऑटो क्र AP-01 TA- 0072 पिवळ्या रंगाचा यामध्ये अवैध्यरीत्या दारू घेवून पिंपरी गावाकडे कडे जात आहे आहे. माहीतीवरून पिवळा रंगाचा ऑटोची झडती घेतली असता ऑटो मध्ये मागील बाजुस खाकी रंगाचे खरड्याचे 04 देशी दारुन (संजिवनी डिस्टीलरी) असे प्रत्येक बॉक्स वर लिहीलेले दिसुन आले, करीता सदर बॉक्स ची पंचासमक्ष उघडुन पाहणी केली असता खाकी रंगाचे खरड्याचे प्रत्येक बॉक्स मध्ये 48 नग असे 4 खरड्याचे खाकी रंगाचे खोक्यात एकुण 192 नग देशी दारू बॉबी संत्रा कंपनीचे प्रत्येकी 180 एम.एल. क्षमतेने भरलेले सिलबंद पव्वे प्रत्येकी 80/- रु. प्रमाणे एकूण किं. 15360 रु/- रु. चा मुद्देमाल. तसेच शिटर ऑटो रिक्षा अपे कंपनी क्र AP-01TA-0072 पिवळ्या रंगाचा किंमत 1,50,000 रु चा असा एकुण 1,65,360 रु चा मुद्देमाल मिळून आल्यावरुन जप्ती पंचनाम्याप्रमाने जप्त करण्यात आला आरोपी नामे विठ्ठल लच्छमत्रा बासावार वय 47 वर्षे जात सालेवार धंदा ऑटो चालक मालक रा. वठोली ता. झारी जि. यवतमाळ याचेवर कलम 65 (अ) (ई) म.दा. का प्रमाने कायदेशिर कार्यावाही करण्यता आली आहे. सदर कार्यावाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री कुमार चिता यवतमाळ अप्पर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बेन्सल यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक पांढरकवडा श्री एल. डी. तावरे, यांचे सुचनेनुसार गुन्हे शोध पथकातील नितीन सुशिर, विलास जाधव, सचिन काकडे, संदिप मडावी, राजु मुत्यालवार यांनी केली आहे.
