प्रथम मल्टी ट्रेनिंग सेंटर राळेगांव येथे शिक्षकांची परसबाग विषयी प्रेरणादायी कार्यशाळा

प्रथम मल्टी ट्रेनिंग सेंटर राळेगांव येथे शिक्षकांचे परसबाग विषयी प्रेरणादायी कार्यशाळा…

“प्रथम एज्युकेशन फाउंडेशन”
व मा.गटशिक्षणाधिकारी
श्री.
शेख लुकमान साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक : 25/07/2023 ला शाळा परसबाग करिता एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. ज्यामधे तालुक्यातील 12 जि. प. शाळा व एक आश्रम शाळा अशा 13 शाळेतील शिक्षकांना कार्यशाळेतून माहिती देवून परसबागेकरिता देसी बियाणे व झाडांची रोपे देण्यात आली.
• कार्यशाळेचे प्रशिक्षक – श्री . राहुल कांबळे व श्री.पांडुरंग लोखंडे यांनी एक दिवशीय कृतीयुक्त कार्यशाला घेवून परसबागेची माहिती दिली.
• कार्यशाळेचे प्रास्ताविक – श्री.प्रदीप कोरडे “युथ नेट कार्यक्रम” यांनी केले.
• कार्यशाळेला उपस्थित – श्री. संदीप तंतरपाळे व श्री.आशिष इंगळे यांनी प्रथम मल्टी ट्रेनिंग सेंटर मध्ये चालणा-या . कोर्स संदर्भात माहिती दिली व कार्यशाळेचे संचालन केले. कोर्स बाबत थोडक्यात असे की,आठवा वर्ग नापास ते दहावी नापास,B.E,BSC इ. 18ते 35 या वयोगटातील मुली-मुलांना 2000 रूपयात दोन महिण्याचे निवासी ट्रेनिंग दिल्यानंतर लगेच जाॅब दिल्या जातो हे या संस्थेने गरजू विद्यार्थांना दिलेली फार मोठी संधी आहे. महिण्याच्या 1 व 15 तारखेला प्रवेश दिल्या जातो.
• कार्यशाळेला उपस्थित – श्री. प्रमोद कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. ही कार्यशाळा राळेगांव तालुक्यात प्रथमत:च घेण्यात आली.आणि अगदी स्वत:चे अन्न आपण कमी जागेत कसे तयार करु शकतो व दररोजच्या आहारात त्याचा वापर तसेच ताजा,सकस व पौष्टिक आहाराची निर्मिती आणि रसायनमुक्त परसबागे मध्ये भाजीपाला व फळपिके लागवड याविषयी जबरदस्त अनुभव सदर कार्यशाळेत मिळाला.
अशाप्रकारे एकदिवशीय
परसबाग कार्यशाळा
सफलता पूर्वक संपन्न झाली.
शिक्षण विभाग पं.स.राळेगांव सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

राळेगाव तालु