परभणी येथील संविधान विटंबनेप्रकरणी निषेध नोंदवून आरोपींना शिक्षा करण्याची मागणी व भिमसैनिकाला आर्थिक मदत देण्याची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

परभणी येथे झालेल्या भारतीय संविधान विटंबनेप्रकरणी प्रकरणी राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता यांनी निषेध नोंदवला असून विटंबना करणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत असून त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षाचे अभय असून अजूनही त्यांना अटक करण्यात आली नसून निष्पाप भिमसैनिकाला पोलिस कोठडीत अतिशय बेदम मारहाण केल्यामुळे त्या भिमसैनिकाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला असून अजूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी ताबडतोब शासनाने चौकशी करून आरोपीला अटक करण्यात यावी सोबतच पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या भिमसैनिकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी.सोबतच या प्रकरणी अनुयायावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे . गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी व भारतीय संविधानाची शान युगानुयुगे अबाधित रहावी अशी मागणीचे निवेदन राळेगाव तहसीलदार यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी राळेगाव, जिल्हाधिकारी यवतमाळ व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात येणार असून अशा आशयाचे निवेदन सादर करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंच राळेगावचे डॉ.विठ्ठल लढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, इंद्रजित लभाणे, बाबा नगराळे, राहुल उमरे, राजू गोटे, भिमराव वागदे , अक्षय ढाले, विनायक गोटे आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.