भारतीय लोकशाही मधील क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी ” राष्टवंदना ” देवून केली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वराज्य महामंच संस्थापक अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आज “‘ भाव पुष्पांजली सोहळा ” आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गोविंद चव्हाण, सेवा निवृत्त वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते मार्गदर्शक म्हणून मा प्रा मोहनजी वडतकर, मा महादेव कोडापे साहेब, मा चारुदत्त नेरकर,मा आशा ताई काळें मा शैला मिर्झापुरे प्रामुख्याने उपस्थित होते
स्वातंत्र्याच्या चळवळीत सातत्याने सहभागी असलेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी राष्टवंदना देवून केली पाहिजे असे मत मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी “‘ भाव पुष्पाजली”‘ कार्यक्रमातून व्यक्त केले
“‘ भाव पुष्पांजली “‘ पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी असलेले सर्व मान्यवरांनी विषयांच्या अनुषंगाने मानवतावादावर भाष्य केले तर काही मतं व्यक्त करताना माणुसकी संपत आहे असे मत व्यक्त केले या निमित्ताने समाजातील अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यात प्रामुख्याने मा गिरीधरजी ससनकर गुरुजी डॉ रेखाताई निमजे राजेंद्र कापसे आरीफ शेख राजेश मडावी सेवा निवृत्त नायब तहसीलदार मा मधुकर घसाळकर सेवा निवृत्त गटविकास अधिकारी मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा प्रल्हाद काळे सोनाली मरगडे सर्व ग्राम स्वराज्य महामंच सामाजिक संघटना च्या विचाराला जुडलेली मानसं आज “‘ भाव पुष्पांजली “‘ पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाली होती