

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ६० गरजू शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप सविस्तर वृत्त असे. स्वातंत्र्याच्या ७६व्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त रिधोरा येथे वाल्मिकी ॲग्रो ट्रेडर्स वर्धा या संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला असून त्यामध्ये सामाजिक कार्य म्हणून गरजू शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर भेट म्हणून ताडपत्रीचा वाटप करण्यात आला आहे. सदर हा वाटप प्रशिक्षणाला उपस्थित गावातील उमेश गौऊळकार (सरपंच) , सोसायटी अध्यक्ष विष्णू महाजन, ढगेश्वर मांदाडे (पोलीस पाटील), दीपक पवार सोसायटी संचालक, बाबारावजी गौऊळकार संचालक, लीलारामजी लेंनगुरे, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदासजी आडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू गुरनुले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष वाडगुळे, काशिनाथ पंडिले, गजानन पवार, पुरुषोत्तम गुरनुले, संजय राऊत, अरविंद गाऊत्रे ग्राप सदस्य, देवेंद्र वाढंई, आकाश ठेंगणे, गणेश ठेंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रशिक्षणाला गावातील ८० ते १०० शेतकरी उपस्थित होते आणि प्रशिक्षणार्थी म्हणून सुभाष वाटगुळे, अमोल सरदार, प्रफुल पटेलपैक, यांनी पुढील विषयावर प्रशिक्षण दिले. त्यामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व दिवसेंदिवस रासायनिक शेतीवर होणारा मोठा खर्च आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जमिनीची सुपीकता कमी होणे यावर उपाययोजना म्हणून सेंद्रिय शेती हा योग्य पर्याय असून या सर्व बाबी शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आल्या तसेच उपलब्ध संशोधनाचा वापर करून आपण शेतीची पोत राखून कमी खर्चात कसे उत्पन्न वाढवता येईल या विषयावर सुद्धा माहिती देण्यात आली. सेंद्रिय शेती काळाची गरज असून रासायनिक खत व औषधीचा वापर पाल्याभाज्यावर अत्याधुनिक होत असल्यामुळे कमी वयातील मुला, मुलींना किंवा वैरुध्द पुरुष, महिलांना कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला तोंड द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्याला शेतामध्ये घरी खाण्यासाठी तरी पाल्याभाज्या साठी सेंद्रिय खताचा वापर करावा जेणेकरून आपले आरोग्य तरी सुटसुटीत राहील हे करणे आज काळाची गरज आहे. नाहीतर याही पुढे अजून शेतकरी शेतमजूर यांना मोठमोठ्या आजाराला तोंड द्यावं लागेल असल्याचे मत सरपंच उमेश गौरकार यांनी व्यक्त केले आहे. सदर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
