मौजा कारेगाव चे पुनर्वसन करण्यासाठी सरपंचासह गावकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


तालुक्यातील मौजा कारेगाव हे गाव वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे या गावाला लागून मोठा नाला असून पावसाळ्याच्या दिवसात नदीला मोठा पूर आल्यानंतर गावाला मोठा धोका निर्माण होत असून मौजा कारेगाव चे पुनर्वसन करण्यात यावे या करिता कारेगाव वासीयांच्या वतीने ९ डिसेंबर २०२२ रोज शुक्रवारला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी आम्ही कारेगाव वासियांच्या वतीने १९९४ साली पुनर्वसनाबाबत निवेदन देण्यात आले होते तेव्हा पुनर्वसनाबाबत मंजुरी सुद्धा देण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासनाकडून त्याला स्थगिती मिळाली त्यानंतर आजपर्यंत त्यावर कोणतेही प्रकारची दखल घेण्यात आली नाही परंतु तेव्हापासून तर आज पर्यंत वर्धा नदीचे पाणी वेळोवेळी गावात शिरून आम्हा गाववासीयांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी सुद्धा तालुक्यात १८ व १९ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोजा कारेगावचे मोठे नुकसान होऊन गावाला पुराचा वेढा बसला होता त्यामुळे कारेगाव वासियांना दोन ते तीन दिवस गाव सोडून वडकी येथे मुक्कामी राहावे लागले त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात आणखी गावाला धोका असल्यामुळे मौजा कारेगाव चे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता आम्ही गाववासीयांच्या वतीने नम्र विनंती करतो की आमच्या गावचे पुनर्वसन करिता प्रयत्न करून आम्हा कारेगाव वासियांच्या जीवाचे नुकसान होणार नाही व आम्हाला रिठ असे ठिकाण निवडून नदी पासून दोन किलोमीटर अंतरावर गावचे पुनर्वसन करून द्यावे अशा आशयाचे निवेदन कारेगाव वासियांच्या वतीने देण्यात आले आहे.