येवती, धानोरा रोडवर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी


येवती, धानोरा रोडचे काम धीमी गतीने होत असल्याने हा अपघात झाला असल्याची ओरड अपघात थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून होताना दिसत आहे.

सहसंपादक -रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येवती ते धानोरा रोडवर दोन दुचाकी सवार अपघातात गंभीर जखमी झाले आहे. सविस्तर वृत्त असे वनोजा येथील मधुकर नानाजी वाघाडे वय ४० वर्षं व गजानन पंजाब टेकाम वय ३० वर्षं हे दोघेही रा. वनोजा येथील असुन दि.४ मे रोजी दुपारी चारच्या दरम्यान आपल्या दुचाकीने वनोजा येथुन वडकी कडे जात असता अचानक गाडीचे येवती गावाजवळ संतुलन बिघडले असता रोडच्या कडेला गाडी जाऊन आदळली व दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना वडनेर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आले आहे.सदर येवती ते दापोरी फाट्या पर्यंत रोडचे काम सुरू असून हे काम धीमी गतीने सुरू असून वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असुन अशा धीमी गतीच्या कामामुळे हा अपघात झाला असल्याची ओरड अपघात थळी उपस्थित नागरिकांन कडून होतांना दिसत आहे.