
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जुने बसस्थानक येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. एकवचनी ,एक बानी प्रभू “श्री राम की जय” अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून निघाला. तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या, मंदिरात सुद्धा तेवढ्याच उस्फूर्त पद्धतीने श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील अनेक ठिकाणच्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात बऱ्याच जणांनी प्रभू राम यांचे गीत रामायण मधील गीते गाऊन जन्मोत्सव साजरा केला . तसेच महिलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव करून सुबक अशी रांगोळी ची आरास काढून प्रभू श्रीराम यांना वंदन केले. व महिलांनी सुद्धा तेवढ्याच थाटामाटात प्रभू रामचंद्र जन्मोत्सव साजरा केला. व दुपारी भव्य दिव्य अशी मुख्य मिरवणूक मार्गे शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मध्ये तरुणांबरोबरच चिमुकली व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील तेवढ्याच प्रमाणात दिसून आला .यावेळी तरुणाईचा उस्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.मोटार सायकलला भगवा ध्वज,तर कुणाच्या चार चाकी वाहनाला प्रभू रामचंद्र असलेला ध्वज, व तरुणांनी भगवा फेटा बांधून प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जयघोष करत जय श्री राम, राजा रामचंद्र की जय अशा घोषणांनी ढाणकी नगरी दुमदुमून निघाली. दरम्यान “श्री राम” यांच्या गाण्यावर ठेकाघेत तरुणाई व चिमुकल्यांनी आनंद घेतला. यावेळी उमरखेड महागाव विधानसभेचे आ. किसन वानखेडे यांनी सुद्धा शोभायात्रेला भेट दिली. पोलिस प्रशासनाने विशेष कामगिरी बजावली .जागो जागी पोलिस बंदोबस्त होता.कोणत्याही बाबीचा गालबोट न लागता प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय शांततेत साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे रोहित वर्मा, महेश पिंपरवार, प्रशांत पंडितकर, दिगंबर शिरडकर, बंटी जाधव, महेश शहाणे, संतोष तीरमकदार, कांता वासमवार, विशाल इंगळे, अनिल गंगरपाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, सचिन कारंजकर, गजानन चापके, महारुद्र बिबेकर, उमेश कुंभारे, पिंटू तोडकर, साहेबराव लकडे इत्यादी व प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या अनेक भक्तांनी शोभायात्रा शांततेत पार पाडण्यास मदत केली.
