सहसंपादक : रामभाऊ भोयर
दीपावलीच्या शुभपर्वावर साप्ताहिक राळेगाव समाचार चा “दिवाळी अंक – 2024” चा प्रकाशन व आदर्श कॉम्पुटर कार्यालयाचा उदघाटन सोहळा राळेगाव शिया इमामी इस्माईली समाजाचे मुखीया परवेज विष्णाणी यांचे शुभहस्ते पार पडला.
यावेळी युसूफअली सैय्यद यांनी आपल्या मनोगतातून साप्ताहिक राळेगाव समाचार हे वर्तमान पत्र पंचक्रोशीतील लोकांना वाटते कि हे वर्तमान पत्र आपल्या हक्काच व्यासपीठ आहे, यातून संस्थापक संपादक स्व. सलीम सागर यांनी व आज फिरोजनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी काँग्रेस चे विलास मुके यांनी लाखाणी परिवाराशी माझी नाळ जुळलेली असून संस्थापक संपादक सलीम सागर हे वयाने जरी मोठे असले तरी माझे संबंध हे त्यांच्याशी मित्रत्वाचे होते त्यांची लेखणी ही सतत अन्याय अत्याचाराच्या विरोधात तळपत होती तीच लकब आज संपादक फिरोज लाखाणी यांच्या लेखणीतून दिसत राजकीय, सामाजिक व्यवस्थेवर प्रहार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीतून दिसते असे मत विलास मुके यांनी व्यक्त केले.
यावेळी संचालन करतांना राजेश नागतुरे यांनी सांगितले कि लाखाणी परिवार हा फक्त राळेगाव समाचार पुरता नसून ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असल्यामुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे शेवटी राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांनी राळेगाव समाचार च्या यशाचे खरे श्रेय वाचक , साहित्यिक मंडळींना देतात यापुढेही आपल्या लेखणीतून दिन दुबळयांवर होणारा अन्याय खपवून घेणार नसल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी प्रा. वसंत पुरके, अरविंद वाढोणकर, विनोद काकडे,मामा चांदे, भूपेंद्रजी कारिया, नाना शिडाम, ऍड. प्रितेश वर्मा यांनी राळेगाव समाचार कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा प्रदान केल्या.