
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव ( ग्रामीण): खैरी ते गोटाडी ह्या प्रमुख सिमेंट रस्त्यावर असलेली जिल्हा परिषद शाळा इमारत क्रमांक दोन समोरील सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शाळेसमोरील रपटा मारेगाव बांधकाम विभागाने उपटला परंतु नवीन नाली टाकून व रोडचे काम होऊन व शाळा सुरू होऊन जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटून हा शाळेसमोरील रपटा अजूनही बांधकाम विभागाने टाकला नाही किंवा बांधला नाही. यासाठी मारेगाव बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी वारंवार कोणा चर्चा फोन द्वारे चर्चा केली असता आज टाकू उद्या टाकू अशीच आश्वासन देण्यात येत आहे. ठेकेदार मुजरा आहे तो आमचा ऐकत नाही अशीच उत्तरे आली.
मग एखादी ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर या बांधकाम विभागाने कार्यवाही करावी. किंवा त्याच्यावर बंधन घालावे. आणि एवढे करून त्या ठेकेदाराचे बांधकाम विभागाकडे काही बिल शिल्लक असेल तर ते त्याला देऊन हा रस्ता व रप्ता पूर्ण करावा. कारण की ह्या रस्त्याकडे पाळले तर देशातील इतिहासात अशा पद्धतीने बांधकाम झालेला हा एकमेव रस्ता दिसतो. परंतु ह्या रस्त्याचे त्वरित बांधकाम न झाल्यास व कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना नुकसान झाल्यास या सर्व सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग मारे गाव याची राहील व त्वरित त्या शाळे समोरील रपटा न टाकल्यास शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग तसेच गावकरी यासाठी तीव्र आंदोलन करतील व याची सर्वस्वी जबाबदारी सर्वाधिक बांधकाम विभाग मालेगाव यांची राहील.
यासाठी शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद केंद्र शाळा खैरी हे ठराव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याची तक्रार करणार असल्याचे समजते. तेव्हा शाळेसमोरील रस्तचे काम त्वरित न केल्यास शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी व पालक वर्ग आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील. अशी वेळ मारेगाव बांधकाम विभागातील येऊ देऊ नये व शाळा समोरील रक्त तात्काळ निर्माण करावा अशीच मागणी होत आहे.
