राळेगाव तालुक्यातील येवती येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे.अशीच एक घटना राळेगाव तालुक्यातील येवती येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज दि 29 ऑगष्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गजानन आनंदराव पुसदेकर वय 55 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव आहे.यांच्याकडे 6 एकर शेती आहे,रात्रीच्या सुमारास तो घरून निघून गेला असता सकाळच्या सुमारास गावाजवळील असलेल्या विहिरीत त्याचे प्रेत आढळून आले.घटनास्थळी वडकी पो,स्टे चे कर्मचारी अशोक भेंडाळे, सह आकाश कुदुसे यांनी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आला,घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.