मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलबित मागण्या पूर्ण करा कोतवाल संघटना उमरखेड यांची निवेदनाद्वारे मागणी

*
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


कोतवाल हे ऐतिहासीक पद असून मानधनावर काम करणाऱ्या पदामध्ये कोतवाल इतर पदे यांचे कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करुन देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो निवडणूक प्रक्रियामध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पार पाडतो. महसूल प्रशासनात नित्यनियमाची कामे जबाबदारीने पार पाडतो . बरेच ठिकाणी तालुका स्तरावर शिपाई, संगणक चालक टपालने-आण करणे संकलनाची कामास सहाय्य करणे अशी विवीध प्रकाराचे कामे करीत आहे. याबाबीचा विचार करणे गरजेचे आहे तसेच महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलन, मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलबित मागण्या दिनांक २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसुन नाईलाजास्तव केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रामाणिक हेतुने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पासून राज्यभर कामबंद आंदोलन तसेच दिनांक २६ सप्टेंबर २०२४ पासून आझाद मैदान, मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन मध्ये उमरखेड कोतवाल संघटना सहभागी राहणार आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, प्रलंबित मागण्या मान्य कराव्या अशा आशयाचे निवेदन उमरखेड तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री , मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देण्यात आले यावेळी कोतवाल संघटना उमरखेडचे अध्यक्ष अभिलाष गायकवाड, तसेच कोतवाल संघटना उपस्थित होती.