
सहसंपादक: रामभाऊ भोयर
भंडारा- पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायत अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यालय च्या प्रांगणामध्ये दिनांक 31 डिसेंबर 2025 रोज बुधवार ला सकाळी १०.३०वाजता पासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालय तर्फे मुख्यमंत्री पंचायतराज ग्राम समृद्धी 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, ६ डिसेंबर डॉ विश्वरत्न ,बोधिसत्व,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ,तसेच २० डिसेंबर वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी, दिनांक 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर ग्राम जयंती महोत्सव निमित्त गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. दिनांक 31 डिसेंबर 2025 ला घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे होते .तर प्रमुख अतिथी अड्याळ जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या सौ सुवर्णाताई शिवशंकर मुंगाटे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्रदीप आंबीलकर, श्री सत्यसाई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक सुनील पोटवर ,ओम शांती सेवा केंद्राच्या इन्चार्ज ब्रह्माकुमारी मीरा दिदी ,प्रेस संपादक व प्रे पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,पत्रकार पत्रकार नितीन वरगंटीवार, पंकज वानखेडे, कनिष्ठ म प्राचार्य बावणे सर, सुजाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भारती घावडे उमेद महिला केदार प्रमुख सौ ताराबाई कुंभलकर, ग्रामविकास अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे ,ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच मुनेश्वर बोदलकर ,ग्रामपंचायत सदस्य आशिक अंबादे ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान, ग्रामपंचायत सदस्या वसुश्री टेंभुर्णे ,ग्रामपंचायत सदस्य नम्रता मडकवार, ग्रामपंचायत सदस्य मनोरमा मडावी ग्रामपंचायत सदस्य मीनाताई निकोडे ,ग्रामपंचायत सदस्य शिल्पाताई गभणे, भाजीपाले मॅडम ,देशमुख मॅडम , मुख्याध्यापक रामरतन मोहरले, प्राध्यापक बादल केवट , मिलिंद भिमकर, विद्यालय सहाय्यक शिक्षक गौतम जनबंधू ,सर हे होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे विश्वरत्न बाबासाहेबआंबेडकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा ,यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून माल्यार्पण आले .त्यानंतर उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर उपस्थित अतिथींनी सदर अभियानाबद्दल ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. आणि ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे मॅडम यांनी शासनाच्या योजना ,कर वसुली बाबत मार्गदर्शन केले. सरपंच शिवशंकर जी मुंगाटे यांनी मागील तीन महिन्यापासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान बद्दल मुलाचे मार्गदर्शन केले .सदर अभियानात सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, गुरुदेव सेवा मंडळ ,सर्व शैक्षणिक संस्था ,सर्व आशा वर्कर, पोलीस स्टेशन कर्मचारी ,होमगार्ड पथक ,अंगणवाडी सेविका, श्री सत्य साई समिती, ग्राम तंटामुक्त समिती उमेशच्या सर्व महिला महिला बचत गट महिला भगिनी ,ओम शांती सेवाभावी संस्था आणि गावातील सर्व सन्माननीय ग्रामवासी यांनी मागील तीन महिन्यातील पंधरा शनिवार सकाळी 8 ते सकाळी 10 वाजता पर्यंत स्वच्छता अभियान व जनजागृती अभियान राबवला .कार्यक्रमाचे संचालन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुनेश्वर बोदलकर यांनी केले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता अभियानात सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी हिरालाजी खंडाईत, भगवान करंजकर ,दिलीप काटेखाये ,पुरुषोत्तम कुंभारे, विजय कोहपरे, प्यारेलाल कुडमते ,नामदेव भुरे ,जागेश्वर वंजारी, सुधाकर मुलकलवार ,प्रशांत पोटवार ,शरद काटेखाये ,विकास टेंभुर्णे, अमोल थुलकर, रामाजी न्यायमूर्ती,, दिनेश ढवळे, पवन वंजारी, गणेश लांजेवार , मधुकर देशपांडे,ग्रामपंचायत सदस्य विपण टेंभुर्णे ,अमोल थुलकर, रामाजी न्यायमूर्ती दिनेश ढवळे ,पवन वंजारी ,गणेश लांजेवार, मधुकर देशपांडे , विकास टेंभुर्णे,शैलेश जांभुळकर , गजानन नखाते,रणजीत लोखंडे संजय फुलबांधे ,राजीव फुलबांधे, कृष्णा मुंगाटे , स्मिता अंबादे, कल्पनाताई साठवणे , वैशाली देशमुख, वैशालीताई देशमुख, वर्षाताई रामटेके ,सविता ढवळे ,यशोदा बोरकुटे, मंदाताई गिरडकर ,लक्ष्मीताई कुंभारे , सुधा वंजारी, भावना टेकाम ,उषा काटखाये, सौ मीनाक्षी फुलवंदे ,लता खोब्रागडे, कल्पना करंजेकर,कांता गडकर ,प्रमिला तिवाडे ,समिता कासारे, अनिता जांभुळकर ,सुलोचना मेश्राम, यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी केलेल्या श्रमदानाबद्दल आणि सहकार्याबद्दल ग्रामपंचायत ग्राम स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल सर्वांचे सर्व उपस्थित पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सन्मानित केले. आणि त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीताने झाले. त्यानंतर सर्वांनी अल्पोपहार लाभ घेतला. उपस्थित सर्व गावकऱ्यांचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी आभार मानले.
