
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शहरात बसस्थानक परिसरातून खरमुरे विक्रेता गजानन येनत्तवार यांची सायकल एका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी ६,३० वाजताच्या सुमारास घडली.गजानन जवळ पंधरा वर्षापासून हिच सायकल आहे बरेच वेळा वर्धा, यवतमाळला याच सायकलनी गेले असल्याचे त्यांनी सांगितले मंगलवारला नेहमी प्रमाणे सांयकाळी दूकान बंद करत असताना एका अज्ञात चोरट्यांने बसचा आडोशाला जाऊन सायकलचे लाक तोडून सायकल पळून नेली थोड्या वेळाने सायकल चोरी गेल्याचे लक्षात येताच बसस्टॉप सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात चोरट्यांनी कथ्या रंगाचे शर्ट घातल्याचे लक्षात आले. वाढत्या चोऱ्यांमुळे पालिसांच्या कार्यक्षमते वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
