महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधीपदी डॉ अशोक फुटाणे यांची निवड

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दिनांक २७/१०/२०२४ रोजी अमरावती विभागीय ग्रंथालय संघांची कार्यकारिणी ची निवडणूक २०२४ ते २०२७ करिता मतदान घेऊन निवडणूक झाली या निवडणुकी मध्ये अमरावती विभागातील चार हि जिल्हे अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम मधून हि निवडणूक घेण्यात आली. प्रस्तूत निवडणुकीत श्री प्रभाकर घुगे वाशिम व श्रीराम देशपांडे चांदूरबाजार या दोन उमेदवारांमध्ये मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत ८४ सदस्यांमधून ६८ सदस्यांनी मतदान केले व ईतर १६ मतदार अनुपस्थित असल्याने ऐकून ६८ मतदान झाले त्या पैकी श्री प्रभाकर राव घुगे यांना ४० मतदान मिळाले उर्वरीत २८ मतदान श्री राम देशपांडे यांना मिळाली.श्री.घुगे हे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून निवड होऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे उपस्थित नविन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली कार्यवाह म्हणून डॉ नालेगावकर यांची निवड करण्यात आली त्याचं प्रमाणे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधी पदि यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष श्रियुत डॉ अशोक बालाजी फुटाणे यांची निवडणूक न घेता सर्वानुमते ऐक मताने निवड करण्यात आली. या निवडी करिता यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री मनोज रणखांबजी, कार्यवाह श्री प्रशांतजी पंचभाई, सदस्य श्री संजय डंभारे, श्री साहेबराव पवार, ॲड निखिलजी सायरे, नागेशजी गंधे, श्री राजेशजी खोडके पाटील, सुरेश भगत, श्री सुनील रामटेके, श्री सुरेश रामटेके व समस्त सदस्य गण यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य करुन अभिनंदन केले