
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मणिपूर येथे महिला भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारचे विरोधात भव्य धडक निषेध मोर्चाचे आयोजन गुरुवारी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहेत माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्ल मानकर तसेच ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोनकर यांचे नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चामध्ये प्रमुख मागण्या मणिपूर येथे महिलावर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची लैंगिक छळ प्रकरणी व्हिडिओ क्लिप वायरल झाली त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मणिपूर सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी तसेच जिल्ह्यात मागील पन्नास वर्षात पाऊस पडला नाही इतका पाऊस पडला त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात हानी होऊन पिके नष्ट झाली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना शासनाने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आदि मागण्या मोर्चात करण्यात आल्या आहेत मोर्चामध्ये नगराध्यक्ष रवींद्र शेराम खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे नगरपंचायत च उपाध्यक्ष जानराव गिरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती भरत पाल वसंत जिनिंगचे उपसभापती अंकुश रोहनकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी मोर्चाला उपस्थित राहणार आहेत तरी या मोर्चाला तालुक्यातील नागरिकांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे माजी तालुकाध्यक्ष अरविंद फुटाणे महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पुष्पा कोपरकर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष जोष्णा राऊत यांनी केले आहेत
