
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेत इनकमिंग सुरूच)
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासाच्या विचारांवर विश्वास ठेवून भीमसेनपुर गावातील विद्यमान सरपंचा, उपसरपंच, सदस्य आणि युवकांनी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेत पक्ष प्रवेश, वरध जिल्हा परिषद गटातील भीमसेनपुर येथील ग्रा.पं. सरपंचा सौ. विमल अंबादास देवनारे, उपसरपंच दिपक हुसेन शिले, शालिक देवनारे (ग्रा.पं.सदस्य), मनोहर जुबगर (सदस्य), गंगूबाई माहेद (सदस्या), माणिक आजीकर (माजी सरपंच), अंकुश देवनारे, अभिमान शिंदे (सदस्य),अभिमान मांगुर्ले,गणेश नागासे, भिमराव अंजिकार, अजय मेटकर, माणिक देवनारे, न्यानेश्र्वर टेकाम, बंड देवनारे,उत्तम कोरझरी, हर्षल सोनुर्ले, संदीप मेश्राम, दुर्योधन मेश्राम, प्रभाकर राऊत, विजय माणगी, कवडू टेकाम, प्रभाकर वागदरे, सुधाकर भानगी, शालिक वडदे, भीमा टेकाम, जिवनभाऊ देवनार, गजानन उईके, गणेश मेश्राम यांनी मनसेत प्रवेश करून नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला आहे.
मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ, ठाम आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असलेल्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या प्रभावी नेतृत्व आणि जनहितातील कार्याने प्रभावित होऊन अनेक उत्साही युवकांनी राज्य उपाध्यक्ष आनंदजी एंबडवार, जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
या नव्या ऊर्जेमुळे मनसेचा झेंडा तालुक्यात आणखी उंचावणार आहे आणि युवकांच्या सहभागातून राळेगांव तालुक्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडणार आहे.या पक्ष प्रवेशासाठी तालुका सरचिटणीस रोशन गुरनुले यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी तालुका अध्यक्ष सुरज लेनगुरे, शेतकरी ता. अध्यक्ष संदिप कुटे, तालुका संघटक संदिप गुरनुले, तालुका उपाध्यक्ष गौरव चवरडोल, गणेश मांदाडे, भोजराज चौधरी, संदेश अर्जुकार उपस्थित होते.
