
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड तुर खरेदीचे आज दिनांक 21/2/2026 रोज शनिवारला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या हस्ते नाफेड तुर खरेदीचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी प्रथम येणारे शेतकरी मेंगापूर येथील नितीन विनायकराव काकडे व तेजणी येथील शेतकरी राहुल बहाळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंदभाऊ इंगोले, उपसभापती मारोतराव पाल संचालक श्रीधरराव थुटुरकर सर पवन छोरीया अशोकराव काचोळे संदीपराव तेलंगे प्रशांत बहाळे कवडूजी कांबळे अभिजित मानकर प्रफुल्ल तायवाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार खरेदी विक्री संघाचे सचिव संजय जुमडे लेखापाल गणेश हिवरकर, कर्मचारी रोशन शिवरकर गौरव आत्राम,मापारी व हमाल यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
