लंपी या आजारापासून दुधाळ आणि इतर जनावरांची काळजी घेणे गरजेचे: गजानन आजेगावकर


प्रवीण जोशी/प्रती
ढाणकी……..

ढाणकी आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या खेडेगावात जनावरांची काळजी घेणे जरुरीचे बनले आहे. ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या व्यवसायावर चालतो त्या दृष्टीने जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे कारण शेतकऱ्याचे आर्थिक बजेट सुद्धा कोलमडू शकते. व होणाऱ्या लंपी या त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गजानन आजेगावकर यांनी शिंदे सरकारकडे केली आहे लवकरात लवकर लस उपलब्ध करून देऊन व खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा राज्य सरकारने विमा उतरावा अशी मागणी करण्यात आली आहे. लंपी आजाराच्या विळख्यात जास्तीत जास्त देशी जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित होताना दिसत आहेत महाराष्ट्रात खिल्लार,साहिवाल,गीर,देवणी,कोकण गीर,रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावारांची संख्या जास्त आहे. सध्या जनावराच्या किमती गगनाला भिडल्या व अशात जनावरे जर बाधित झाली तर पशुपालकाला याचा मोठा फटका बसणार आहे.