
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील ग्राम पंचायत ही पेसा अंतर्गत येणारी ग्राम पंचायत असून या गावातील विकासकामांला ईतर ग्राम पंचायत पेक्षा काही प्रमाणात जास्त निधी येत असल्याचे कळले असून फक्त तो निधी कशा पद्धतीने आणि कुठे खर्च करायचा हे पदाधिकाऱ्यांवर अवलंबून असते.अशातच गावकरी आणि ग्राम पंचायत या मधला दुवा म्हणून कार्यरत असलेले सचिव यांची जर भुमिका व्यवस्थित असली तरी गावातील वातावरण समतोल राखण्यासाठी सहकार्य होऊ शकते मात्र या गावातील विकासकामे तर सोडाच पण साधी स्मशानभुमी सुद्धा या ग्रामपंचायतीने व्यवस्थित ठेवली नाही.या स्मशानभुतीतील एक शेड जिर्णावस्थेत असून त्याची साधी दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली नाही.तीथे बसविलेला सौर ऊर्जेचा बसविलेला लाईट सुद्धा दिसून आला नाही.त्या परिसरातील आलेल्या लोकांना बसण्यासाठी गावातील दात्यांनी दिलेले बाकडे सुद्धा रंगहीन झाले असून त्याला परत रंगोटी करण्याचा साधा प्रयत्न केला नाही.त्या स्मशानभूमीला बांधकाम करताना केलेली रंगरंगोटी करण्यात आली होती त्यानंतर परत ग्रामपंचायतीने फिरून कधी पाहिलं सुद्धा नाही किंवा रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न केला नाही. परिसरातील वाढलेले काटे, झाडेझुडपे स्मशानभूमीच्या परिसरात प्रवेश करताना असलेल्या बाहेरच्या दोन्ही भिंतींच्या बाजू झाडाझुडुपांनी वेढल्या असून कधी ग्रामपंचायतीने साफ करून घेतले नाही. अशा वेळी ग्राम पंचायतमध्ये सत्ताधाऱ्यांची एक हाती सत्ता असून विरोधी बाकावर बसणारे तीन सदस्य असल्याने त्यांना कुठल्याही कामात विश्वासात घेतले जात नाही.अशी माहिती ग्राम पंचायतचे विरोधी सदस्य रामधन राठोड यांनी दिली .अशा परिस्थितीत गाव आणि ग्रामपंचायतीच्या मधली योग्य भूमिका बजावणाऱ्या सचिवांनी मनावर घेतले तर छोटी मोठी कामे ते पण मार्गी लाऊ शकतात पण असेही होत नाही अशातच वेळात वेळ काढून श्रावणसिंग वडते सर, रामधन राठोड, किरण निमट प्रशांत भोरे, भानुदास चव्हाण, रमेश राठोड पुनेश्वर ऊईके देवा कामटकार, अनिकेत कामटकार, आदित्य पेंदोर, गजानन झाटे, सौरभ वडते यांनी स्मशानभूमीची पाहणी केली असता तेथील दैनिय अवस्था पाहून लागलिच तेथील तरूणांच्या माध्यमातून परिसरातील वाढलेला काटे झाडेझुडपे स्वच्छता करून घेतली आणि राहिलेला उर्वरित स्वच्छता येत्या एक दोन दिवसात करणार असल्याचे श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
