
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नाशिक वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक दिनांक २३ चे एक वाजता अचानक डीवाईडर चढल्याने ट्रक चे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.नाशिक वरून शेती उपयोगी क्रेशरचे भाडे घेऊन यवतमाळ मार्गे येत असताना करनवाडी जवळ ट्रक क्रमांक एम एच १९.झे१४७३ चंद्रपूर कडे जाण्यासाठी मध्यरात्री जात असताना करनवाडी जवळ हायमास्ट लाईट बंद असल्याने ट्रक सरळ दुभाजकावर चढल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे ड्रायव्हर ने सांगितले .सुदैवाने ट्रक ने पलटी घेतली नाही नाहीतर मोठी हानी झाली असती.करणवाडी फाट्याजवळ ट्रक चालकांना विश्रांती घेण्यासाठी दोन्ही बाजूने जागा सोडली आहे.त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून हायमास्ट लाईट लावण्यात आले आहे. परन्तु ते गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.रात्री दुभाजक दिसून पडत नाही. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
