आर्णी तालुक्यातील अंजी येथील ४५ जणांना जेवणातून विषबाधा दोघांची प्रकृती चिंताजनक

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि:17/08/2021 तालुक्यातील अंजी येथील धार्मिक कार्यक्रमा निमीत्त गावातील नागरिकांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी जेवण करून आपल आपल्या घरी गेल्या नंतर रात्रीच्या सुमारास कार्यक्रमामध्ये जेवन केलेल्या ४५ व्यक्तींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घटना उघडकीस आली . या घटनेनंतर ४५ जणांना जवळच असलेल्या भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. रुग्ण संख्या वाढत असतांना आर्णी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मात्र दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने वसंतराव नाईक मेडिकल कालेज यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील अंजी नाईक येथे रवी राठोड यांच्या घरी गेल्या सात दिवसापासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी काल्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जेवणाची पंगत सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला.जेवण झाल्यावर नागरिकांना संडास आणि उलटीचा त्रास सुरू झाला. ४५ जणांना आर्णी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथे हलविण्यात आले.