आटोमोबाइल व मल्टीस्किल च्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार व कौतुक

तिरोड़ा – जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे व्यवसाय अभ्यासक्रम ऑटोमोबाईल इंटर्नशिप प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आणि विद्यार्थी कौतुक सोहळा रोज मंगळवार दि 14 / 02 /2023 रोजी स. 11.00 ते 3.00 दरम्यान आयोजित केले होते.

महाराष्टात ६४६ शासकीय शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना ११ ट्रेडचे व्यवसाय शिक्षण दिले जाते. यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी सहज उपलब्ध व्हाव्यात हा मानस ठेवून इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा च्या माध्यमातून ८० तासांची इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे.

सदर कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केला होता यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे प्राचार्य मा. श्री. जी. एच. रहांगडाले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डी. एन. उपराडे, के. बी. बनसोड सर, पी. एस. रहांगडाले सर, एस. आर. दिघोरे सर, कु. वाय. यू. राऊत, सर, ठाकरे सर, विनोद हरीणखेडे सर, कु. शुभांगी मेश्राम मॅडम, पटले मॅडम, कु. ऊर्जा कटरे मॅडम, कु. दिव्यांनी जमईवार मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथील व्यवसाय अभ्यासक्रम ऑटोमोबाईल च्या 29 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आटोमोबाइल शिक्षक उमेंद्र एच. रहांगडाले सर यांनी केले. तर आभार खुशाल आगाशे यांनी केले.