
सहसंपादक: रामभाऊ भोयर
खैरे कुणबी समाज, यवतमाळ यांच्या वतीने २६ जानेवारी २०२६ रोजी दादासाहेब कोल्हे सभागृह (लॉन), यवतमाळ येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. महिलांसाठी आयोजित या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमास खैरे कुणबी समाजातील भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विद्या रमेश बोभाटे (हिंगणघाट) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. सौ. लीना गजानन शेंडे (हिंगणघाट) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील महिलांची भूमिका, संघटनाचे महत्त्व व सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत विचार मांडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुनीता अरुण जुनघरे, सौ. सुवर्णा संदीप कोल्हे, सौ. दिशा प्रशांत कोल्हे, सौ. शारदा मुरलीधर धनरे, सौ. कांता बाबाराव नंदुरकर, सौ. सीमा धनंजय लोखंडे, सौ. नीलिमा संजय पंडित व सौ. उज्वला विकास झाडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर शास्त्रीय नृत्यप्रस्तुतीने करण्यात आली. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधील विजेत्यांना श्री. विकास झाडे यांच्या ‘इंदुकुश फाउंडेशन’तर्फे पैठणी पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आल्या. हळदी-कुंकू निमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू श्री. निश्चल ठाकरे यांच्या सौजन्याने देण्यात आल्या, तर भोजन व्यवस्थेची जबाबदारी श्री. साहेबराव जुनघरे यांनी सांभाळली.
पैठणी स्पर्धांचे परीक्षण अपर्णा अंबरकर, रुपाली नघाटे, रचना सोनवणे व रुपाली नागपुरे यांनी केले. या स्पर्धेचे उत्तीर्ण पहिले बक्षीस अर्चना पांडे (राळेगाव), दुसरे बक्षीस दिशा कोल्हे, दुसरे बक्षीस वृषाली दोहीजोड हे होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संदीप कोल्हे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच श्री मुरलीधर धनरे, श्री रवींद्र निशाणे, श्री विकास झाडे, , श्री जनार्दन वाघ श्री अरुण शेंडे, श्री लक्षणराव घोटेकर साहेब, संजीव पंडित भाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन खैरे कुणबी समाज, पश्चिम विदर्भ अध्यक्षा सौ. रीना विजय धनरे, तसेच अखिल कुणबी महासंघ प्रदेश संघटक सौ. कविता रविंद्र निशाणे, सौ. ज्योती श्रीकांत जामनकर व सौ. दुर्गा निखाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांचन शिकार, माधुरी निखाडे, संजीवनी निखाडे, सीमा लाकडे, शिल्पा फरकाडे, साक्षी घोगरे व मंगला पोटे यांनी अथक परिश्रम घेतले.
या हळदी-कुंकू समारंभास मोठ्या संख्येने खैरे कुणबी समाजातील भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
