
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायक स्वार जखमी झाल्याची नुकतीच घटना राळेगाव तालुक्यातील वाटखेड गावाजवळ घडली
अंकूश महादेव लढी रा,मांडव ता. राळेगांव हल्ली मु. लोहारा हे २७ जून रोजी ११.३० वाजताच्यासुमारास राळेगांव तालुक्यातील वाटखेड गावाजवळ असलेल्या कॅनल जवळून मोटर सायकलने जात होता. त्याला अज्ञात वाहनाची धडक लागली. त्यामुळे उपचारार्थ मेडीकल हॉस्पीटल नागपुर येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काल त्याची पत्नी श्रीमती वंदना अंकुश
लढी हीने राळेगांव पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दि 17 जुलै रोजी पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
