अवैध धंदयाना संरक्षण देणाऱ्या ठाणेदाराची तात्काळ बदली करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा

सर्वपक्षीय नेते मंडळीची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )

जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी , यवतमाळ
यांना ढाणकी शहरातील सर्व पक्ष राजकीय नेते पदाधिकारी आणि गावातील समाजसेवकांनी निवेदन देत उपरोक्त ठाणेदार म्हणून बिटरगाव पोलिस स्टेशन ठाणेदार सुजाता बनसोड यांची बदली करण्याची मागणी केली आहे .गावातील सन्मानीत लोकासह सामान्य लोकांना उध्दट वर्तणुक, सार्वजनिक सन उत्सवा दरम्यान शांतता समितीवर अविश्वास ,पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात मोठया प्रमाणात गावठी दारु , मटका , गुटखा अवैध धंदे व मेन चौकाततील वाहतूक जाम समस्या यावर प्रतिबंध घालण्यात ठाणेदार बनसोड अपयशी ठरल्या आहेत की, या धंद्यावर ते जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे प्रश्न उपस्थित करत .
रवि जाधव या पोलिस कर्मचाऱ्याचे (सी.डी.आर) रिपोर्टवर ताबा ठेवतो . रवि जाधव हे ठाणेदार बनसोड यांचे पती आहे . हे पोलिस कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनात भरपुर माया कमवित असल्याची शंका असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी . तसेच कर्तव्य चोख बजावनाऱ्या जमादार मोहन चाटे यांची बदली रद्द करावी व प्रकरणचे निवेदन देणाऱ्या नागरिकांच्या विरोधात अवैध धंद्यात हितसंबंध असणाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल होवु नये .तसेच सबब निवेदन देणाऱ्यांना ,शासनाकडून सुरक्षा देण्याची मागणी करत पाच दिवसात निर्णय न घेतल्यास ,लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा देत सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस प्रशासन स्वतः जबाबदार राहील .आमच्या गावाची कायदा, सुव्यवस्था,शांतता कायम राखण्यासाठी या मागणीला गांर्भीयाने घेत ठाणेदार महोदयांची तात्काळ बदली करण्यात यावी. अशी मागणी ढाणकी शहरातील सर्व पक्ष राजकीय नेते पदाधिकारी आणि गावातील समाजसेवकांनी केली आहे .