समस्या : माजरी येथील स्मशानभूमीची दुरावस्था ,गावकऱ्यांची दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी : निखिल बडगु

भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील स्मशानभूमीतील शेडची दुर्दशा झाली आहे .अंतिम संस्काराला येणाऱ्या नागरिकांना येथे पोहचाताना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे इतक्या मोठ्या गावातील स्मशानभूमीतील शेड ची दुर्दशा ही लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे तदगावातील काही सुजाण नागरिकानी स्मशाभूमीतील लाईट , शेड ,वॉल कंपाऊंड ,रोड या सर्वांची व्यवस्था करावी अशी मागणी विपुल तिवारी, आकाश राऊत ,अर्जुन डोंगरवार, पियूष सिंह ,अभिजित यांनी केली आहे .यावर वेळीच कारवाई न झाल्यास ग्राम पंचायत ला ताळे ठोकू असा इशारा ही देण्यात आला आहे.