
राळेगाव तालुक्याच्या ठिकाणापासून वारा हे गाव अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे वारा या गावात वर्धा नदीचे असंख्य असे मोठे पात्र आहे तरी या वारा गावात जाण्याकरिता दोन छोटे पूल म्हणजेच केनाडी कॅनडी चे छोटे फुल आहे .प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये या दोन्हीही पुलाला असंख्य असे पाणी पुलावरून जात असल्यामुळे गावातील गावकऱ्यांना व शाळकरी मुलांना असंख्य असा त्रास दरवर्षी सहन करावा लागतो . या त्रासाविषयी माननीय आमदार जिल्हा परिषद सदस्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ग्रामपंचायत सदस्य धवल घुंगरूड तसेच तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी यांनी वारंवार याकरिता मागणी केली. पण या पुढार्यांनी या दोन्ही पुलाकडे हेतू पुरस्कृत दुर्लक्ष केल्यामुळे पाच वर्षापासून गावातील लोकांना याचा नाहक असा त्रास होत आहे .आज गावात कोणताही पेशंट असो वा कोणतेही शाळकरी विद्यार्थी असो यांना या पुलावरून येण्याकरिता मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी, समस्त गावकरी मंडळीची अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा फुल मंजूर होऊन मोठा पूल बनवण्यात यावा.
