
सहसंपादक: रामभाऊ भोयर
उदगीर (जि. लातूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा मंडळ, राळेगाव येथील खेळाडूंनी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि विजेतेपद पटकावले. या यशामुळे परिसरात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुले या वयोगटात
हिमांशू ठाकरे, सोहेब पठाण, कुंदन हिवरकर, नयन तेलंगे, सम्यक पाटील व हिमांशू महाजन
या खेळाडूंनी संघभावना व कौशल्याच्या जोरावर विजय मिळवला.
तसेच १७ वर्षांखालील मुले या वयोगटात
मंथन ठाकरे, वेदांत बोदडे, नयन पेंदोर, अर्पित राऊत, यश ढगले व सोहम साळवे
या खेळाडूंनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या संघाच्या यशामागे प्रशिक्षक प्रफुल खडसे, किशोर उइके,मनोज निमसडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच नवोदय मंडळाचे मार्गदर्शक सदस्य महेश भोयर, नरेश दुर्गे, गणेश काळे, सोनू खान, मोनु खान, महेश राजकोल्हे, चेतन नाकाडे, आदित्य मरसकोल्हे तसेच नवोदय क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी संघाला वेळोवेळी प्रेरणा व मार्गदर्शन केले.
या घवघवीत यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून भविष्यातही अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
