सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे जागतिक स्काऊट स्कार्फ डे साजरा

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


सहसंपादक : रामभाऊ भोयर

सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी अंतर्गत कब, बुलबुल, स्काऊट, गाईड, रोवर रेंजर्सचे युनिट्स दरवर्षी राबविले जातात. या अनुषंगाने आज जागतिक स्काऊट स्कार्फ डे साजरा करण्यात आला. आणि प्रहरी गटाची स्थापना करण्यात आली.तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अन्नाभाऊ साठे जयंती कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी संस्थाअध्यक्ष मेजर रणधीर सिंह दुहान, प्राचार्य सचिन ठमके, अध्यापक मधुकर उबाळे यांचे स्कार्फ घालुन क्रिडा विभाग व स्काऊट गाईड प्रमुख जितेंद्र यादव यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय स्काऊट रेलीमध्ये सहभागी विध्यार्थी मानव राजू पवार, तन्मय सोमजी मेश्राम, चेतन कैलास ढोकळे , वंश संदिप पुस्नाजके, रोहन राजेंद्र कवाने, सागर सचिन पवार, प्रतिक आनंद पवार, पियूष संजय शेडमके, हर्षल वणीत पवार, लोकेश प्रमोद कोटणाके व स्काऊट प्रमुख आरव राजू जयस्वाल, ओम रवि चाफले यांचा प्रमुख अतीथी च्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तयावेळी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रा.गीत खुराणा , प्रा.अस्मिता चौढरी, राकेश सिंह दुहान,प्रा.मीनेश गौरकर, प्रा.अंकुश गजभिये, प्रा .प्रफुल चौथे,प्रा. भरत कुमार, कला शिक्षक मेफुज अली, संगीत शिक्षक अतुल तांदुरकर, विजय चांदेकर , एन्सिसी प्रमुख प्रणव श्किरसागर आदींनी यांनी सहकार्य केले.