
—————————————————————————-
सहसंपादक : रामभाऊ भोयर
**
आदिवासी समाजात रुढी परंपरा वर्षानुवर्षे चालत असल्याने आमची संस्कृती सन उत्सव संस्कार इतर धर्मा पेक्षा वेगळे आहे म्हणून आम्ही निसर्ग पुजक आहोत आमच्या गोंड समाजात ” टुंडा मुंडा कुंडा ” आणि पेनकाडा म्हणजेच ” देव कारण ” ह्या रुढी परंपरा आम्ही वर्षानुवर्षे करत आलो आहोत परंतु सुशिक्षित श्रीमंत, राजकारणी लोक अशा कार्यक्रमात सहभागी होत नाही ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे* असे स्पष्ट मत तिरुमल मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी मेटीखेडा पहुर (ईजारा ) येथे व्यक्त केले देव कारण कार्यक्रम चे आयोजन गोंड समाज पेणकाडा पहुर ईजारा येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात आमंत्रित म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी , अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच बाजीराव आत्राम, हे सहभागी झाले होते अनेक आजुबाजुला असलेले समाज बांधव कार्यक्रमात सहभागी झाले होते या देव कारण कार्यक्रमात सुगरण गायन करण्यासाठी आदिलाबाद वरुन थोटी पाटाडी यांना बोलावून देव कारण सुमरण शांती गायण करण्यात आले होते आदिवासी समाजाची संस्कृती टिकून रहावी यासाठी मधुसूदन कोवे गुरुजी सातत्याने आदिवासी समाजात कोणताही कार्यक्रम असो ढेमसास्पर्धा, दडांर कार्यक्रम, कोलाम समाजाची गावबाधनी, देव कारण असो जयंती पुण्यतिथी असो अशा सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी होत असतात म्हणून पहुर ईजारा येथे गोंड समाज पेणकाडा समिती च्या सर्व समुदायानी मधुसूदन कोवे गुरुजी यांचे स्वागत केले *आणि अनेक समाज बांधव मित्र परिवार या कार्यक्रमात सहभागी संतोष कनाके, मेटीखेडा बाजिराव आतराम लोणी हुशेण खोरद सखी चारुदत्त नेरकर यवतमाळ नितीन ठाकरे, बाबाराव आडे मेटीखेडा मधुकर मरस्कोले दिलीप मेश्राम भरपुर समाज बांधव गावकरी सहभागी झाले होते संतोष कनाके परीवार यांनी सर्वांचे आभार मानले
