प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने तारखेला तहसील कार्यालया समोर भव्य धरणे आंदोलन केले होते त्या मध्ये श्रावण बाळ याजने अंतर्गत येणाऱ्या निराधार लोकांना दिवाळी पूर्वी मानधन द्यावे हि मागणी केली होतो ते पूर्ण झालेली दिसते येत्या दोन- तीन दिवसात निराधार नागरिकांना मानधन मिळणार हि प्रक्रिया चालू झाली,सरकार कडून निराधारांना मिळणारे मानधन हे तीन चार महिन्यापासून मिळाले नाही तर कोणाचे सहा महिन्यापासून मिळाले नाही, त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी दूसरे साधन नाही जिवनात गाडा कसा चालवावा व तोंडवर आलेली दिवाळी कशी साजरी करावी याची चिंता होती आता ते दोन -चार दिवसांनी मानधन मिळणार आहे. मनसे च्या दणक्याने सरकारला जाग आली. अशी भावना लोकां मधून व्यक्त होत आहे.सदर आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे,तालुकाध्यक्ष सचिन यलगन्धेवार, साजिद शेख तालुकाध्यक्ष(उमरखेड) शहराध्यक्ष कपिल ठाकरे यांच्या नेत्रुत्वात पार पडले.या आंदोलनात तालुका उपाध्यक्ष अविनाश बोरकर तालुका उपाध्यक्ष चंदन भगत, तालुका सचिव भूषण पाटील,मनविसे शहराध्यक्ष अरविंद मस्के व तालुक्यातील असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
