
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य शासनाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते परंतु राज्य शासनाने कर्जमाफीचा कोणताही अध्यादेश काढला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी मोठे आंदोलनही केले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांची कर्ज परतफेड करण्याची मानसिकता दिसून येत नाही जर राज्य शासनाने कर्जमाफी न केल्यास विकास सोसायटी पतसंस्था व जिल्हा सहकारी बँकेचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोवर्धन वाघमारे यांनी व्यक्त केले आहे
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण, लाडका भाऊ झाल परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडका शेतकरी दिसला नाही का कारण सरसकट कर्जमाफी करण्याचे दिलेले आश्वासनही निवडणुकीत यशासाठी सहाय्यभूत ठरले आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही हा कळीचा मुद्दा आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे डोळे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लागलेले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत सलग अतिवृष्टी झाली. त्यामुळे रोगराई वाढली. विदर्भातील कापूस, सोयाबीन, कापूस पीक उद्ध्वस्त झाले. असून शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षनीय घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. वर्षाचे उत्पन्न तर बुडाले, झालेला खर्च, कर्जाचा बोजा मात्र डोक्यावर बसला. या अडचणीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच एक मार्ग दिसतो. त्यासाठी कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे.
निवडणुकीच्या काळात सरकाने सर्व घटाकांना हवी ती आश्वासने दिली. योजनांमधून अर्थलाभ देऊन अनेक घटकांना दिलासा देण्यात आला. पण शेतकरी मात्र अद्याप वंचित आहे. आता तरी सरकार शेतकऱ्यांकडे बघणार का हा सवाल आहे.
आतापर्यंत केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजना
केंद्र सरकार —
२००८ ला देशातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ७२ हजार कोटीची कर्जमाफी केली
राज्य सरकार–
२०१४ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना
राज्य सरकार—
२०१९ महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
राज्य सरकार —
२०२४ राज्य शासनाची कर्जमाफीची घोषणा
शेतकऱ्यांचे कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष
विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती सरकार येऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी अद्यापही कर्जमाफीची कुठलाही आदेश नाही मात्र शेतकऱ्यांना कर्ज माफ होण्याची आशा असल्याने शेतकरी कर्ज परतफेड करण्याच्या मानसिकतेत नाही त्यामुळे विकास सोसायटी, पतसंस्था व जिल्हा सहकारी बँकेचे अस्तित्व धोक्यात येईल
श्री गोवर्धन वाघमारे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राळेगाव
