तरुणांचा विद्युत करंट (शॉक) लागून दुर्दैवी मृत्यू,बोळधा येथील घटना

नेरी वरून जवळ असलेल्या बोळधा येथील तरुण शेतकरी अमोल देवराव नाकाडे वय 37 वर्षे आज दि 17 ऑक्टोबर ला सकाळी पहाटे 5 वाजता शेतात शौचास गेला असता जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांनी विद्युत करंट लावला होता सदर बाब या तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा स्पर्श लावण्यात आलेल्या तारेला झाला यात त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला
बोळधा येथील शामराव चिरकुटा घोंनमोडे यांच्या मालकीचे गावालगत शेत असून या शेतातून लोहारा नवतला नेरी साठी विद्युत खांब गेले असल्याने या खाबावरून रात्रीला शेतपिकाचे रक्षण करण्यासाठी विद्युत घेऊन करंट लावत असल्याची चर्चा गावात सुरू आहे सदर शेतात अनेकदा डुकरे मरून पडले असल्याचे गावकऱ्यांना दिसले असून रात्रीसुद्धा डुकर विद्युत करन्टने मेले असल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे सदर घटनेची माहिती भिसी पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले शवाचे पंचनामा करून पुढिल कारवाईला पाटविण्यात आले
सदर शेतात जंगली डुकर सुद्धा विद्युत करंट ने मुत्यु झाल्याची बाब समोर आली असून वनविभागाने व पोलीस विभागाने व महावितरण महामंडळ ने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ दोषींवर कारवाई करून आरोपीची कारागृहात रवानगी करावी अशी मागणी मुतुकाच्या कुटुंबियाणी व गावकऱ्यांनी केली आहे सदर घटनेने तरुण शेतकऱ्यांचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बोळधा गावात शोककळा पसरली आहे पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे