.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि.3/3/2025 रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद भाऊ काकडे व राळेगाव शिवसेना विधानसभा प्रमुख दिगांबरजी मस्के यांच्या नेतृत्वात व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कळंब येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शेतकऱ्यांना अद्यापही संपूर्ण कर्जमुक्ती मिळालेली नाही. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर करूनही योग्य दर मिळत नाही. तसेच, शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल.
आजच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल.
झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी असंख्य शिवसेना पदाधिकारी यात सहभागी झाले होते त्यामध्ये राळेगाव विधानसभा प्रमुख दिगांबर मस्के,उपजिल्हा प्रमुख विनोद भाऊ काकडे, कळंब तालुका प्रमुख गुरुदेव भाऊ राऊत,कळंब शहर प्रमुख कुशल बोकडे,राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख इम्रान पठाण, बाभुळगाव शहर प्रमुख सचिन माटोडे,राळेगाव उप शहर प्रमुख दिपक येवले, राळेगाव तालुका महिला आघाडी वर्षाताई मोघे,राळेगाव शहर महिला आघाडी पार्बताबाई मुखरे,उप तालुका प्रमुख प्रशांत भाऊ वार्हेकर, तालुका संघटक सुरेंद्र भाऊ भटकर,व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर,शंकर भाऊ गायधने, किशोर कापसे,अमोल राऊत,अखिल निखाडे,गजानन केराम,मडावी(येवती) सह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
