
सहसंपादक: रामभाऊ भोयर
मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.पंचायत समिती मारेगाव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२२ – – २०२३ या वर्षातील सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता तसेच मजुराऐवजी मशिनव्दारे कामे सुरू आहेत. मजुर कामावर हजर नसताना त्यांची उपस्थिती दाखवून मजुरी पत्रके काढणे, काही ठिकाणी कामे झाली नसताना सुध्दा मजुरांची उपस्थिती दाखवून बोगस मुल्यांकन करून कामाचे रकमा काढल्या जात असून हे वरिष्ठांच्या मर्जीनुसार केल्या जात असल्याचे दिसून येते आहे यासंदर्भात प्रहार ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम यांनी म्हटले आहे की. तालुक्यात कोणत्याच ठिकाणी कामे मजुरांच्या हातून करण्यात आले नाहीत. विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीत लोकांना हाताशी धरून ही कामे केली आहेत. त्यांच्या बिले काढून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे.
