दोनही मुलींनी काकाला दिला खांदा मुलींनी बजावले मुलाचे कर्तव्य

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील वडतकर परिवारावर दुःखाचा डोंगर सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील सुप्रसिद्ध असे व्यक्ती महत्त्व शामराव वडरकतर (पाटील) यांचे चिरंजीव प्रमोद शामराव वडरकतर यांचे ११डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शामराव वडतकर यांना दोन मुली दोन मुले असा परिवार होता यात दोन मुलींचे व एका मुलाचे लग्न झाले होते वडतकर परिवार हा गावामध्ये सगळ्यात श्रीमंत परिवार म्हणून ओळखल्या जात होता त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन होती त्यांना ग्रामीण भागात शामराव वडरकतर पाटील हे मालगुजर म्हणून ओळखले जात होते तर शेकडो एकर जमीन पैकी काही जमीन सिलिंग वाटपात देण्यात आली तर काही जमीन दानपत्रावर देण्यात आली होती आजही त्यांच्याकडे ४० ते ५० एकर इतकी जमीन आहे. तर त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्या नंबरचा मुलगा प्रकाश वडतकर यांचे ही लग्न झाले होते त्याला दोन मुली.आहे .एक राणी प्रकाश वडतकर तर दुसरी रिना प्रकाश वडतकर परंतु प्रकारच्या दोन्ही मुली वयाच्या १० ते १२ वर्षाच्या असताना प्रकाश चेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर काकाच्या छत्रछायात मोठ्या झालेल्या राणी व रीना यांचेही लग्न होऊन ते आपापल्या सासरी राहू लागल्या आहेत अशातच प्रमोद शामराव वडरकतर यांना किडनीच्या आजाराने ग्रस्त केले होते आठ ते नऊ वर्ष किडनी आजाराने ग्रस्त असल्याने अखेर त्यांनी ११ डिसेंबर च्या पहाटेला शेवटचा श्वास घेतला आहे. तर प्रमोद हा अविवाहित असल्यामुळे व मोठ्या भावाला मुलगा नसून दोन मुली असल्यामुळे शेवटी दोनही मुलीने मुलाचे कार्य बजावून आपल्या काकाला खांदा देऊन मुलाची कमी न भासू दिली असल्याने त्यांचे रिधोरा सह परिसरात वाहवा केली जात आहे. सदर प्रमोद शामराव वडरकतर (पाटील )हे सगळ्यांशी मनमिळाऊ व स्वयं मी स्वभावाचे असल्याने यांच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात वहीनी श्रीमती विद्या प्रकाश वडतकर व दोन पुतण्या राणी, रिना , नातवंड असा आप्तपरिवार आहे