
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण दिं ११ मार्च २०२२ चे ठराव नुसार नगरपंचायतीने नगरविकास विभागाकडे नवीन व्यापारी संकुल व प्रशासकीय बांधकाम इमारतीकरिता ५ कोटी निधीची मागणी केली आहे. या शिवाय अनेक विकास कामां संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार
राळेगांव नगर पंचायत ने केलेला आहे.
ही नविन नगर पंचायत असून सन २०२२-२३ करीता वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत खालील प्रमाणे विकास कामाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी नगरपंचायतीने या बाबत नगरविकास विभागाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.
जुनी असलेल्या ग्रामपंचायतिच्या जागेवर वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत नगर पंचायत राळेगांव येथील नवीन व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारती करिता वरील प्रमाणे विकास कामांकरीता लागणारा निधी आपल्या कडून उपलब्ध करूण देण्यात यावा जेणे करूण शॉपिंग सेंटर गाळे, प्रशासकिय ईमारत व वाचनालय बांधकाम करणे सोईचे होईल याकरिता राळेगाव नगरपंचायतीने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गीरी व बांधकाम सभापती संतोष कोकूलवार यांनी अव्वर सचिव नगर विकास मंत्रालय मुंबई याचे कडे केली आहे.
