
मटक्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठाणेदाराकडून पैशाची मागणी,पाटण पोलीस स्टेशन मधील प्रकार आडिओ क्लिप झाली वायर
प्रतिनिधी: नितेश ताजणे,वणी
वणी :- पोलीस उपविभातील पाटण पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदार या एका अवैध मटका व्यवसायिकाला दिपावली झाल्यावर मटका चालविण्यासाठी परवानगी देईल त्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याची एक ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस म्हटलं की कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही तटांची जबाबदारी व नागरिकांच्या सर्वस्वी सुरक्षतेच्या हमी आहे. कोणतेही अनुचित प्रकार व अनधिकृत व्यवसायावर निर्बंध लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु चक्क ठाणेदार पदावरून जर कोणी अवैध व्यवसायसला चालना देत असेल व त्यांचे कडून आर्थिक रसद मागत असेल तर हा कायद्याला मूठमाती देऊन पदाचा गैरवापर व आपल्या कर्तव्यातील खूप मोठा कसूर आहे. असाच प्रकार पाटण पोलीस स्टेशनमध्ये घडल्याची एक ऑडिओ क्लिप प्रचंड वायरल होत आहे. त्यात ठाणेदार महिला अधिकारी एका अवैध मटका चालविण्याऱ्याकडून पैशाची मागणी करीत आहे. तसेच त्यांनी त्यांचे अनेक आरोपी कसे पकडले त्याचे किस्से देखील सांगत आहे. व दिपावली नंतर वरली मटका चालू करण्यासाठी परवानगी देऊ असे वाक्य प्रयोग केल्या जात आहे. अश्या वायरल ऑडिओ क्लिप मुळे पोलिसांची प्रतिमा चांगलीच मल्लिन झाली झाली असून जनमानसात या प्रकाराची चांगलीच चीड निर्माण होत आहे.
चौकशी करून उचित कार्यवाही करण्यात येईल – पो.अ. पवन बनसोडे
या संदर्भात सदर प्रतिनिधीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांच्याशी संपर्क करून याबाबत विचारणा केली असता या विषयी संबंधित महिला ठाणेदार यांना लेखी जबाब विचारण्यात आला आहे. व या विषयी ऑडिओ क्लिपची तपासणी करून संपूर्ण रीतसर चौकशी अंती त्यांचेवर उचित कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
ती क्लिप बनावट आहे – महिला पोलीस अधिकारी
वायरल झालेली क्लिप ही बनावट असून मला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे. मी एक महिला असून मी मागिल दोन वर्षांपासून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मी माझे काम सुरळीत करत आहे. असे मत या क्लिप बाबत मला काहीच माहिती नाही अशी माहिती संबंधित महिला पोलीस अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी दिली आहे. याबाबत काय सत्यता आहे ती चौकशी अंती बाहेर येणार आहे.
