
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका काँग्रेस च्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान – मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या आक्रोशाला वाचा फोडणे करिता तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके बोलत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी चे आश्वासन देऊन मते घेतली होती.ती पुर्ण करण्याची मागणी प्रा.वसंत पुरके यांनी केली. राळेगाव विधानसभा मतदार संघात हुकुमशाही चे राजकारण सुरू असुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही दबावात येऊ नये आम्ही आपल्या सोबत आहो अशी सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली .या आंदोलनाच्या एकुण १७ प्रमुख मागण्याचा समावेश होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.२) शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी ३) राळेगाव तालुक्यातील मजुर वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ४) शेतकरी बांधवांना सरसकट पिक विमा देण्यात यावा ५) ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहरांप्रमाणे प्रती घरकुल रु.२,५०,००० येवढे अनुदान देण्यात यावे.ग्रामिण व शहरी असा भेदभाव करण्यात येऊ नये.६) घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्वरीत देण्यात यावे.७) अतिक्रमीत घरकुल लाभार्थ्यांना शासनाने राहत्या जागेचा मालकी हक्क पट्टा देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा ८) ज्या घरकुल लाभार्थ्यांकडे स्वतः ची जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी ९) अल्पसंख्याक घरकुल योजने अंतर्गत सर्व अल्पसंख्याक समुदायाला घरकुल योजना त्वरीत मंजुर करण्यात यावी.१०) राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा अत्यंत त्रास होत आहे.उभ्या पिकाची नासाडी, पाळीव जनावरे मारणे, शेतकरी शेतमजूर यांचेवर हल्ला करणे या सारखे प्रकार नेहमी घडत आहेत.तरी शासनाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.११) शेतकऱ्यांना बियाणे पेरणीसाठी स्वतंत्र देण्यात यावे तसेच शेत पांदण रस्ते त्वरीत सुरु करण्यात यावी.१२) घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी.१३) शहरासह तालुक्यांमध्ये धडक सिंचन विहीर योजना त्वरीत सुरु करण्यात यावी १४) प्रलंबित कृषी पंपाची विज जोडणी त्वरीत सुरु करण्यात यावी १५) तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदभरती वरील बंदी हटवून युवकांना नोकरी देण्यात यावी तसेच शिक्षकांच्या भरत्या त्वरीत करण्यात याव्या १६) राळेगाव नगर पंचायत ची रखडलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत सुरु करण्यात यावी १७) राज्य शासनामधील काही मंत्री धार्मिक चिथावणी खोर भाषणे करून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करीत आहे तरी त्यांच्या वर कार्यवाही करुन त्यांना मंत्री मंडळातुन बरखास्त करावे या प्रमुख मागण्याचा समावेश आहे.या धरणे आंदोलनात पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतियांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. धरणे आंदोलनात भारत जोडोअभियानचे यवतमाळ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर , अरविंद वाढोणकर, उत्तम खंडारे,राळेगाव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष राजु तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, नगर पंचायत चे नगराध्यक्ष रवि शेराम, नगरसेवक नंदु गांधी, खरेदी विक्री चे अध्यक्ष मिलिंद इंगोले, सोसायटी चे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, नगरसेवक कमलेश गहलोत, नगरसेवक कुंदन कांबळे, नगरसेवक मधुकर राजुरकर,हमीदभाई पठाण,बंडु लोहकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दिपक देशमुख, आनंदराव बोंदरे, रविंद्र खैरकार, उत्तमराव फुटाणे, राजकुमार जवादे , नगरसेवक दिलीप दुदगीकर, रणजित कोरडे,उन्मेष पुरके ,जया रागीनवार, मारोतराव पडाळ,चंदु कानारकर, फिरोज लाखाणी,अफसरभाई, पंकज गावंडे,रवि गलांडे, गजानन ढाले, निलेश रोठे, शशांक केंढे, बाभुळगाव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मोहन बनकर, पांडुरंगजी लांडगे, सुनील मते,अमेय घोडे,राजु ओंकार , प्रकाश पोपट,विजय कनाके,नारायण पिसे, सचिन राडे, दिलीप मोहीते,अमृत पाझारे,कृष्णाजी झाडे, अंकुश मुनेश्वर, सदानंद भोरे,बाबा केशववार ,शरद घोसले,थुटुरकर सर, बाबासाहेब दरणे, मंगेश पिंपरे, अशोक उमरतकर,वॅनिश भोसले, किशोर धामंदे,प्रफुल, तायवाडे,राजू पत्रे,रामु भोयर,मनोज पवार, भाऊराव कुडमेथे,अल्काताई कुडमथे, पुरुषोत्तम चिडे, राहुल होले,मोहन मडावी,वडते सर,भरत ठुणे, संदीप भारशंकर, धनराज इंगोले,विलास हिवरकर,शुभम सरोदे,ऋषभ कडू, विठ्ठल पंदरे,बाबाराव वरटकर,राजु चिडे,राजु पुडके,अभिलाष उमरे, हेमंत तागडे,संजय पडोळे,आर.जी.खोबरे, छत्रपती ढवळे, राजेश काळे,तातेश्वर पिसे,गजु नाकाडे,विकी इंगळे, सुमित डाखोरे,शंकर सोनतापे, चंद्रकांत कान्हेरकर, अशोक भागवत,मंथन सोनवाणे, गजानन पाल,अंकीत कटारीया,रवि गलांडे,रामधन राठोड, जनार्दन कडू, सदानंद भोरे,राजु पुरके,किरण निमट, दिलीप निमट, नामदेव काकडे, तुळशीराम दारुंडे,मनोज इंगोले, सचिन राडे,सागर वनस्कर,शेख अब्दुल, राहुल बहाळे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.मा.तहसीलदार, राळेगाव यांना मागण्याचे निवेदन सादर करून धरणे आंदोलनाची सांगता झाली.
