म्हशी घेऊन जाणाऱ्या कंटेनर वाहनावर वडकी पोलिसांची कारवाई,४७ लाखाचा मुद्देमाल जप्त राळेगाव

नागपुर हैद्राबाद महामार्गावरील वडकी पोलीस स्टेशन हद्दीत बोरी ईचोड गावाजवळअवैधरित्या म्हशी घेऊन जाणाऱ्या कंटेनर वाहनावर वडकी पोलिसांनी कारवाई केली . वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथून वडकी मार्गे आदीलाबाद कडे जाणाऱ्या एका कंटेनर वाहनांमध्ये अवैध्यरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली . या माहितीवरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी वडकी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरी इचोड गावाजवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहन क्रमांक RJ – 14 GL – 3339 वाहन थांबवून पाहणी केली असता या वाहनांमध्ये काळ्या रंगाच्या म्हैस एकूण ३० नग प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे एकूण १२ लाख रुपये सोबत कंटेनर वाहन किंमत ३५ लाख रुपये असा एकुण ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल वडकी पोलिसांनी जप्त केला . याप्रकरणी आरोपी विरुध्द वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात विनोद नागरगोजे , निलेश वाढई ,विलास जाधव , विकेश धावर्तीवर यांनी पार पाडली .