
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
प्रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सावरखेड तालुका राळेगाव येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला ,याप्रसंगी अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथील प्रतिनिधी कु. एम .आय .देवकर मॅडम व प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथील प्रतिनिधी श्रीमती कोकोडे मॅडम शाळा तपासणी व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.प्रथम 10:30 वाजता प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर आलेल्या प्रतिनिधी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले भजन व ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून गावकऱ्यांची मने जिंकली. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबाची पुष्प देऊन कार्यालय प्रतिनिधीच्या हस्ते स्वागत करण्यात आले ,तसेच निवासी विद्यार्थ्यांना पुस्तक, नोटबुक ,गणवेश वाटप करण्यात आले त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक एच.ए.डंभारे सर तर प्रमुख पाहुणे कार्यालयीन प्रतिनिधी कुमारी देवकर मॅडम व श्रीमती कोकोडे मॅडम व प्राथमिक मुख्याध्यापिका कुमारी मानकर मॅडम उपस्थित होत्या. कुमारी देवकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे संचालन अमर कोंडापलकुलवार सर यांनी केले तर प्रस्ताविक मानकर मॅडम तसेच आभार प्रदर्शन झलके सर यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रम झाल्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला या कार्यक्रमाला सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
