
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकऱ्यांना फेरफार व सातबारा आठचे वाटप करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह सुरू असून या सप्ताह निमित्य रिधोरा येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी रिधोरा येथील शेतकरी श्रीमती भारती रवींद्र इंगोले, चंदन राजेंद्र कांडुरवार, तुळसाबाई बाबाराव मेश्राम या शेतकऱ्यांचे सदर या सात दिवसाच्या कालावधीत फेरफार मंजूर झाले असल्याने सप्ताह निमित्त या शेतकऱ्यांना मंडळ अधिकारी बाबारावजी पोटे, तलाठी दुर्गेश बावनकुळे, गिरीश खडसे, कोतवाल दीपक खीरडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या फेरफार सह सात बारा आठचे वाटप करण्यात आले आहे सदर या सप्ताहानिमित्त गावातील शेतकरी दिपक पवार, सुरेश पंढरीनाथ गायत्रे, देवेंद्र महादेव वाढंई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
