

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राजीव गांधी तालुका क्रीडा
संकुल राळेगाव येथे १ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव व हौसी कबड्डी असोसिएशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहेत.
आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दुपारी ४ वाजता राजीव गांधी क्रीडा संकूल येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना.संजयजी बनसोडे, उद्घाटन माजी खासदार राजाभाऊ ठाकरे व माजी आदिवासी विकास मंत्री आ. प्रा. डॉ. अशोक उईके तर प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,आ. मदन येरावार, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार,आ.ऍड.इंद्रनील नाईक,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे,ऍड.क्रांतीताई राऊत (धोटे),बाळासाहेब मांगुळकर, बाळासाहेब कामारकर, अभय राऊत, सुधीर वानखेडे, चित्तरंजनदादा कोल्हे , डॉ. शितल बल्लेवार आदी उपस्थित राहणार आहे. परीसरात नागरिकांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या चित्तथरारक सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक संस्थेचे सचिव संतोष कोकुलवार यांनी केले आहे.
