पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची निवड

प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव


महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्रीबाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सूचनेनुसार श्री हनुमान मंदिर संस्थान मानवाडी येथील नूतन कार्यकारिणीची निवड बैठक पार पडली आहे. याप्रसंगी हदगाव तालुका अध्यक्षपदी श्री सुभाष पाटील पवार अंबाळा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व उपाध्यक्ष पदी श्री दत्तात्रय पाटील चंदनवार चिकाळा, व श्री दत्तात्रय पाटील मस्के बरडशेवाळा तर
सचिव पदी श्री बाळासाहेब पाटील कल्याणकर हादगाव,
सहसचिव गंगाधर पाटील जामगडे माटाळा,
कोषाध्यक्ष प्रल्हाद पाटील कदम शिवनी, सह-कोषाध्यक्ष श्री नरहरी पाटील मिटकरी डोरली,
व तसेच जिल्हा कार्यकारणी निवडीमध्ये
कार्याध्यक्ष श्री कबीरदास पाटील कदम साप्ती, जिल्हा संघटक ज्ञानदेव पाटील दुगाळे वायपना,
हदगाव हिमायतनगर विभागीय अध्यक्ष श्रीराम पाटील सूर्यवंशी तालंग, महिला जिल्हा सदस्य सौ कविता ताई साळवे यांची निवड झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी पाटील जोगदंड मार्गदर्शक व सल्लागार, मराठवाडा उपाध्यक्ष श्री शंकरराव पाटील शिरशीकर, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री भास्कर पाटील कंकाळ, उपाध्यक्ष श्री माधवराव पाटील टाकळे, सचिव श्री संभाजी पाटील मडगीकर, लोहा तालुका अध्यक्ष श्री वैजनाथ पाटील पांचाळ, भोकर तालुका अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील कापसे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली आहे.
व तसेच नवीन कार्यकारिणी चा जिल्हाध्यक्ष श्री भास्कर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व शेवटी कार्यक्रमाचा समारोप व आभार श्री सुभाष पाटील पवार यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.